Site icon e लोकहित | Marathi News

Ajit Pawar । अजितदादांच्या मुलाच्या शाही लग्नाला पवार घराण्याची दांडी; अनुपस्थितीमागचं कारण नेमकं काय?

Ajit Pawar
Ajit Pawar

Ajit Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलगा जय पवारचा बहरीनमध्ये भव्य आणि शाही विवाहसोहळा ४ ते ७ डिसेंबर दरम्यान होणार आहे. या लग्नासाठी देश–विदेशातून निवडक पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले असून तयारीही अत्यंत जोशात सुरू आहे. मात्र या सोहळ्याच्या अगोदरच सर्वांचे लक्ष वेधून घेणारी एक मोठी माहिती समोर आली आहे — पवार घराण्यातील काही महत्त्वाचे सदस्य या लग्नाला उपस्थित राहणार नसल्याचे समजते.

विश्वसनीय सूत्रांनुसार, अजित पवारांचे सख्खे धाकटे भाऊ श्रीनिवास पवार हे या शाही लग्नाला जाणार नाहीत. त्याच दिवशी त्यांना बंगळुरू येथे एका कौटुंबिक लग्नसोहळ्यास उपस्थित राहायचे असल्याने ते बहरीनला जाऊ शकणार नाहीत. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रतिभा पवार हेही या सोहळ्यात सहभागी होणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पवार घराण्यातील राजकीय मतभेदांना उधाण आल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

मात्र कुटुंबातील सर्वच सदस्य गैरहजर राहणार नाहीत. शरद पवार गटाचे युवा नेते आणि श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार आपल्या पत्नी तनिष्कासह जय पवारच्या लग्नाला बहरीनमध्ये हजेरी लावणार आहेत. सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळेही या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे काही मोठे नेते अनुपस्थित असले तरी पवार कुटुंबातील तरुण पिढी हा कार्यक्रम गाठणार आहे.

बहरीनमध्ये होणारा हा विवाहसोहळा चार दिवसांचा असून ४ डिसेंबरला मेहंदी, ५ डिसेंबरला हळदी, वरात आणि मुख्य लग्नाची रस्म होईल. ६ डिसेंबरला बीच ऑलिम्पिक्स आणि ७ डिसेंबरला रिसेप्शन ठेवण्यात आले आहे. या संपूर्ण सोहळ्यासाठी केवळ ४०० पाहुण्यांना निमंत्रण आहे.

Spread the love
Exit mobile version