Ajit Pawar | “मला राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष केलं तरीही मी पक्षाचा अध्यक्ष होणार नाही”, अजित पवारांच्या विधानाने उडाली खळबळ

Ajit Pawar Ajit Pawar's statement, "Even if I am made the president of the Nationalist Congress Party, I will not be the president of the party".

राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांत हाय होल्टेज ड्रामा सुरू आहे. दरम्यान २ मे रोजीच राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. या घोषणेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

Sara Ali Khan । सारा अली खानचा स्विमिंग पुलमधील ‘तो’ फोटो व्हायरल; फोटोमधील मुलगा नक्की आहे तरी कोण?

लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी (Sharad Pawar) ही घोषणा केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी निवृत्त होऊ नये यासाठी भावनिक आवाहन केले आहे.

Virat Kohali । ‘त्या’ १ कोटी दंडाच्या रकमेतील एक रुपया सुद्धा विराट कोहली देणार नाही; हे कारण आले समोर

आता शरद पवार निवृत्त झाले तर पुढचा अध्यक्ष कोण होणार याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. ज्यामध्ये तीन नावे प्रमुख आहेत. पहिले नाव सुप्रिया सुळे यांचे आहे, दुसऱ्या क्रमांकावर अजित पवार आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावर जयंत पाटील आहेत. जयंत पाटील हे अनेक वर्षे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्यांचे नाव देखील या पदासाठी चर्चेत आहे.

Anil Dujana | मोठी बातमी! उत्तरप्रदेशमध्ये आणखी एका गँगस्टरचा इन्काऊंटर; जागीच झाला ठार

आता याबाबत अजित पवार यांना पत्रकाराने एक प्रश्न विचारला की, शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला नाही तर तुम्ही अध्यक्ष होणार का? या प्रश्नाच उत्तर देताना अजित पवार म्हणाले, माझा अध्यक्ष होण्याचा काही प्रश्नच येत नाही. मला राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष केलं तरी देखील मी पक्षाचा अध्यक्ष होणार नाही. अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या या विधानाची सगळीकडे जोरदार चर्चा देखील सुरु आहे.

Viral Video | अजगराने केले बकरीला फस्त आणि नंतर…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *