Ajit Pawar । उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) बारामतीमधून उमेदवारी जाहीर करून आपली उपस्थिती दर्शवली आहे. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार याना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे हा निवडणुकीचा सामना खूप महत्त्वाचा आहे. युगेंद्र पवारांनी अर्ज भरताना शरद पवारांची उपस्थिती दर्शवून या निवडणुकीचे महत्व अधोरेखित केले. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी बारामतीच्या मतदारांवर विश्वास व्यक्त केला आहे आणि ते म्हणाले, “बारामतीचे मतदार सुज्ञ आहेत, त्यामुळे ते मलाच निवडून देतील.”
Ajit Pawar । ब्रेकिंग! अजित पवार गटाची चौथी यादी जाहीर, या नेत्यांना मिळाली संधी
अजित पवार महायुतीचा भाग असल्याने त्यांनी महायुतीच्या विविध योजनांचा प्रचार केला आहे. त्यांनी लाडकी बहीण योजना आणि शेतकरी वीज माफी यासारख्या योजनांचा उल्लेख करत म्हणाले, “आमचे सरकार लोकाभिमुख कारभार करत आहे.” यावेळी युगेंद्र पवारांविषयी बोलताना अजित पवारांनी सांगितले की, “ते माझ्या विरोधात आहेत, पण हा लोकशाहीचा भाग आहे. प्रत्येकाला उमेदवारी उभा राहण्याचा अधिकार आहे.”
Ajit Pawar । अजित पवार यांच्या उमेदवारीच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या पाच महिला कोण आहेत?
याबाबत अजित पवारांनी बारामतीकरांना आवाहन करत सांगितले की, “आम्ही आमची बाजू मांडू आणि मतदारांना ते योग्य वाटेल तसा निर्णय घेण्यास स्वातंत्र्य आहे.” अजित पवारांना शरद पवारांबरोबर पुन्हा एकत्र येण्याबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की, “राजकारणात काहीही होऊ शकते.” त्यांनी शरद पवारांची नक्कल करण्याबद्दल नाराजी व्यक्त करत, “साहेबांनी माझी नक्कल करणे वेदनादायी आहे,” असेही सांगितले.
Eknath Shinde । धक्कादायक! ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदार गायब झाल्याने राज्यात मोठी खळबळ!