
मुंबई : मागच्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सोशल मीडियावर कायम चर्चेत आहे. उर्वशीने काही दिवसांपूर्वी तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओनंतर उर्वशी आणि पाकिस्तानचा गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) यांचे नाव एकमेकांसोबत जोडलं जातंय. यामुळे सोशल मीडियावर चर्चाही चालू आहेत. दरम्यान, नसीम शाहने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Central Govt: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! तांदळाची निर्यात बंद; सर्वसामान्यांवर काय परिणाम?
नसीम शहा उर्वशीबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता, उत्तर देत तो म्हणाला, “उर्वशी रौतेला कोण आहे, मला माहिती नाही. ती कोणते व्हिडीओ शेअर करते याबद्दल मला काहीही माहिती. सध्या मी माझे लक्ष फक्त क्रिकेटवर आहे. मला चांगले क्रिकेट खेळायचे आहे,” असा शब्दांमध्ये नसीम शहाने प्रतिक्रिया दिली आहे.
Chad Naseem Shah asks, Urvashi? Who? pic.twitter.com/iSa2Efzo9d
— عادل مغل 🇵🇸 (@MogalAadil) September 10, 2022
राज्यातील शेतकरी राजासाठी आणखी एक योजना, वर्षाअखेरीस मिळणार ‘एवढी’ रक्कम
पुढे तो म्हणाला, “मी मैदानावर क्रिकेट खेळत असतो. त्यामुळे मला याबाबत कोणतीही कल्पना नाही. जे लोक स्टेडियममध्ये येऊन सामना पाहतात, त्यांचे आभार मानायला हवेत. कोणाला मी आवडत असेन तर ती चांगली गोष्ट आहे.”