Site icon e लोकहित | Marathi News

वडिलांच्या निधनानंतर मी गायी विकून एक एकर जमीन घ्यायचो; अजित पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

After my father's death, I used to sell my cows and buy an acre of land; Ajit Pawar told that story

काल बारामती (Baramati) या ठिकाणी एका खाजगी डेअरीचं उद्घाटन झालं आहे. हे उद्घाटन अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी अजितदादांनी दूध व्यवसायाशी आपला संबंध कसा होता याबाबत मोठा खुलासा केला आहे.

राज्यामध्ये पुन्हा सत्ताबदल? बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले, ज्यावेळी माझ्या वडिलांचे निधन झाले त्यावेळी मी देखील दुधाचा धंदा करायचो. मी दूध धंदा करूनच पुढे आलो आहे. असा मोठा खुलासा यावेळी अजित पवार यांनी केला आहे.

ब्रेकिंग! ‘या’ देशाने देखील घातली टिकटॉक अ‍ॅपवर बंदी

त्याकाळी मी गायी विकायचो आणि त्याबदल्यात एक एकर जमीन घ्यायचो. त्याकाळी एक गायी साडेसात हजारांना विकली जायची आणि त्याबदल्यात साडेसात हजार रुपयांना एक एकर जमीन यायची. त्यावेळी जमिनीचे दर कमी होते आणि गायींबद्दल प्रचंड कुतुहल होतं’ असं देखील अजित पवार म्हणाले आहेत.

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज खेडमध्ये जाहीर सभा

Spread the love
Exit mobile version