Site icon e लोकहित | Marathi News

दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हे माझे ध्येय आहे आणि…”

After being sentenced to two years, Rahul Gandhi reacted; Said, "This is my goal and..."

मोदींना त्यांच्या आडनावावरुन डिवचने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना चांगलेच महागात पडले आहे. सुरत कोर्टाने राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवले असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. अगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींसाठी हा मोठा झटका असल्याचे सांगितले जात आहे.

बायकोचे दागिने गहाण ठेऊन लोकांना फुकट हेल्मेट वाटतोय ‘हा’ माणूस; मित्राचा अपघात झाला म्हणून…

राहुल गांधी यांनी एका सभेदरम्यान मोदी या आडनावावरून टिपण्णी केली होती. त्यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कोर्टाने आता निकाल दिला असून राहूल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याप्रकरणी राहुल गांधी यांना जामीन देखील मंजूर झाला आहे. आता या प्रकरणावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आत्ताची सर्वात मोठी बातमी! राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा; मोदींवर टीका करणे पडले महागात

याबाबत राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहे. सत्य हे माझे ध्येय आहे आणि अहिंसा माझे साधन आहे,” अस ट्विट त्यांनी केले आहे. सध्या हे ट्विट चर्चेत आहे.

दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्नाटक येथे राहुल गांधी यांची मोदी ( Modi) आडनावावरून जीभ घसरली होती. यावेळी भाजपचे आमदार पुर्नेश मोदी यांनी भावंदी अंतर्गत मानहानीचा दावा दाखल केला होता. याबाबत आज सुरत कोर्टात निकाल होता. यासाठी राहुल गांधी सकाळीच दिल्लीहून विमानाने सुरतला आले होते.

मोठी बातमी! एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला आमदार खासदारांसोबत आयोध्या दौऱ्यावर जाणार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Spread the love
Exit mobile version