
Aditya Thackeray । उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांचे सुपुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या पुढील काळात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांची एसआयटीची चौकशी होणार असल्याची बातमी समोर आली होती. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीची बातमी आली होती यानंतर राजकारण देखील चांगले तापल्याचे पाहायला मिळाले. मात्र या बातमीनंतर आदित्य ठाकरे नेमके कुठे? अशी चर्चा सुरू झाली होती मात्र सध्या आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रात नसून दुबईत असल्याची माहिती समोर आली आहे.
दिशा सालियानचा मृत्यू झाल्यानंतर नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले होते. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडून सुरू आहे आता एसआयटी चौकशी होण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. आदित्य ठाकरेंना लवकरच अटक होणार असून ते अटक टाळण्यासाठी परदेशात पळून जाणार असल्याचा दावा नितेश यांनी केला होता. त्यानंतर आज एसआयटी चौकशी आणि आदित्य ठाकरे दुबईला गेल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळा चर्चांना उधाण आले आहे.
Bjp । सर्वात मोठी बातमी! भाजपच्या दोन बड्या नेत्यांनी दिला तडकाफडकी राजीनामा
मात्र आदित्य ठाकरे हे सध्या दुबईमध्ये एका परिषदेसाठी गेले आहेत. संयुक्त राष्ट्रांची वार्षिक जागतिक हवामान परिषद दुबईत सुरू असून या परिषदेसाठी आदित्य ठाकरे दुबईला गेलेले आहेत. आदित्य ठाकरे यांनी याबाबत एक ट्विट देखील केले आहे.
Pune – Mumbai Expressway Accident । पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर कारचा भीषण अपघात, ४ जण गंभीर जखमी
I am at #COP28 to gain perspective on latest developments in the climate sphere. I will also have the honour to speak at multiple events sharing my insights and policy work in Maharashtra as a former minister for environment and climate change, and a legislator. pic.twitter.com/2EPGetBLRP
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 6, 2023