
मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर (Amrita Khanwilkar) होय. तिने अभिनयाच्या जोरावर प्रत्येकाच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. अमृताने बाॅलिवूडमध्ये (Bollywood) देखील चांगली कामगिरी केली आहे. ती कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी खाजगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते.
धनुष्यबाण व शिवसेनेबाबत निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय!
अभिनेत्री अमृताने 2015 साली हिंदी मालिकांमधील अभिनेता हिमांशू मल्होत्राशी लग्न केलं आहे. त्या दोघांची पहिली भेट 2004 साली झाली होती. तब्बल नऊ वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर अमृताने बॉयफ्रेंड हिमांशुसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. अमृता सोशल मीडियावर बर्यापैकी सक्रिय असते.
ब्रेकिंग! राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीला अंधेरी कोर्टात केलं हजर
अमृता अनेकदा दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. पण या सगळ्यात आता अमृता तिच्या पतीपासून वेगळे राहत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याचवेळी अमृताच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अमृता आणि हिमांशूमध्ये काही तरी वाद झाला आहे अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
देवेंद्र फडणवीसांनी घेतली सूत्रे हातात; कसबा चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अमृता आणि हिमांशूने आपल्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. त्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. पण यावेळी अमृताने पती हिमांशूला सोशल मीडियावर ब्लॉक केल आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. अमृता आणि हिमांशूला मनोरंजन विश्वात क्युट कपल म्हणून ओळखले जाते.
ब्रेकिंग! राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानीला अंधेरी कोर्टात केलं हजर
यादरम्यान, प्लॅनेट मराठीवरील ‘पटलं तर घ्या विथ जयंती’ या टाॅक शोमध्ये अमृताने त्यांच्या नात्याविषयी खुलासा केला आहे. या आगोदर देखील तिने अनेकदा हिमांशुला ब्लॉक आणि अनफॉलो केले आहे. आता त्यांच्यात नेमके काय घडले आहे. याच उत्तर अमृताच्या चाहत्यांना शुक्रवारी म्हणजेच 10 फेब्रुवारी मिळेल.