Site icon e लोकहित | Marathi News

अभिनेता शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत!

Actor Shah Rukh Khan will be seen once again in the role of an army officer!

चित्रपट सृष्टीमध्ये नेहमीच चर्चेत असणारा बॉलिवूडच्या अभिनेता शाहरुख खान आता आपल्याला वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खान हा प्रत्येक चित्रपटामधे वेगवेगळ्या भूमिकेमध्ये दिसत असतो. परंतु यावेळी तो आर्मी ऑफिसरच्या भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. शाहरुख खान यापुर्वी देखील ‘फौजी’, ‘मैं हूं ना’ आणि ‘जब तक है जान’ या चित्रपटांमध्ये प्रेषकांसमोर आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसला आहे.

गोमूत्र ठरतंय आरोग्याला हानिकारक! संशोधनात समोर आली धक्कादायक माहिती; वाचा सविस्तर

शाहरुख खानला काही दिवसांपूर्वी पठाण चित्रपटामुळे चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. तसेच शाहरुख खान या वर्षी देखील नवीन चित्रपटासोबतच प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. डंकी आणि जवान हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पठाण चित्रपटामध्ये शाहरुख खान हा गुप्तहेरांच्या भूमिकेत होता. परंतु या नवीन चित्रपटांमध्ये शाहरुख खान हा आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत असणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळी त्यांचा पक्षप्रवेश होईल, फडणवीसांचे मोठे वक्तव्य

शाहरुख खान सध्या जवान आणि डंकी या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. डंकी या चित्रपटामध्ये लोकांची कथा आहे, ज्यांना त्यांच्या घरी परत जायचं आहे. शाहरुख खान पुन्हा आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे प्रेक्षक खुश आहेत. तसेच शाहरुख पुन्हा एकदा लष्कर भूमिकेमध्ये काम करण्यासाठी उत्सुक आहे असे देखील म्हटला आहे. डंकी हा चित्रपट २२ डिसेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कापूस, तूर, सोयाबीनच्या दरात चढउतार होणार! जाणून घ्या सविस्तर

Spread the love
Exit mobile version