Site icon e लोकहित | Marathi News

Accident News । सर्वात भयानक अपघात! शॉर्टकट मारायला गेले भरधाव कार दुचाकीला धडकली, पती-पत्नी हवेत उडाले

Accident News

Accident News । वाहतुकीचे नियम जरी कडक झाले असले तरी देखील अपघाताचे प्रमाण हे कमी झाल्याचे दिसत नाही. लोक नेहमीच वाहतुकीचे नियम मोडून प्रवास करतात. मात्र हा प्रवास करणे अनेकदा धोक्याचे ठरू शकते. अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात. आपले वाहतुकीचे अंतर कमी व्हावे म्हणून शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतात. मात्र हा शॉर्टकट अनेकांच्या जीवावर बेततो. सध्या देखील असाच काहीचा प्रकार एका पती-पत्नी सोबत घडला आहे. (Wardha Accident CCTV VIDEO)

Tecno Spark Go 2024 । 8,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत iPhone सारखा दिसणारा फोन मिळतोय, फीचर्सही आहेत दमदार; जाणून घ्या अधिक

दुचाकी वरून जात असताना एका पती-पत्नीने महामार्गावरून शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र समोरून भरधाव वेगात कार येत होती त्या कारणे पती-पत्नीच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये पती पत्नी उंच हवेत उडाले आणि या घटनेनंतर दोघांनाही आपला जीव गमावाव लागला आहे.

Baramati Lok Sabha । सर्वात मोठी बातमी! बारामतीतून सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप लावणार ताकद

ही घटना वर्धा जिल्ह्यातील नागपूर-तुळजापूर महामार्गावर घडली आहे, बुधवारी दुपारच्या सुमारास घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Ajit Pawar । बिग ब्रेकिंग! अखेर मराठा समाजाच्या विरोधानंतर अजित पवार यांचा दौरा रद्द, नेमकं कारण काय?

Spread the love
Exit mobile version