
सध्या अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर ब्रेक फेल झाल्याने एका ट्रकने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या अपघातामध्ये सहा जण जखमी झाले. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. (An incident has come to light that a truck hit several vehicles due to brake failure on the Mumbai-Pune Expressway in Maharashtra)
Gautami Patil: गौतमी पाटीलबद्दल ‘ही’ गोष्ट एकूण बसेल धक्का!
या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जखमींपैकी कोणालाही मोठी दुखापत झालेली नाही. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले आहे.
अन् महिलेने गाडीवरून मारली उडी! रॅपिडो ड्रायव्हरने महिलेसोबत केले गैरवर्तन
मागच्या काही दिवसापासून राज्यातील रस्ते अपघातांमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ज्यामुळे वाहन चालवताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून दिले जात आहे. तरीदेखील अपघात चालूच आहेत.
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अमेरिकन लेखिकेने केला लैंगिक शोषणाचा आरोप