
सध्या अनेक मोठमोठ्या कंपन्या (Comapany) आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. त्यामुळे अनेकजण लाखोंची नोकरी सोडून व्यवसाय करू लागले आहे. काहीजण तर गलेगठ्ठ पगार सोडून शेती (Agriculture) करू लागले आहेत. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. सिव्हिल इंजिनियर झालेल्या एका तरुणाने नोकरी न करता लाल केळीची शेती (Red Banana) करण्याचा निर्णय घेतला. त्यातून आज तो लाखो रुपयांची कमाई करत आहे. (Latest Marathi News)
राजकीय हालचालींना वेग! पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर? नाना पटोलेंच्या विधानाने चर्चांना उधाण
महाराष्ट्रातील सोलापूरच्या (Solapur) वाशिंबे गावचा रहिवासी असलेल्या अभिजीत पाटील (Abhijit Patil) असे या तरुणाचे नाव आहे. त्याने पुण्यातील (Pune) डीवाय पाटील कॉलेजमधून (D.Y.Patil) सिव्हिल इंजिनीअरिंगचे (Civil Engineering) शिक्षण घेतले असून त्याने नोकरी न करता आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला. त्याने चार एकर जमिनीवर लाल शेतीची लागवड केली. ही केळी त्याने पुणे, मुंबई, दिल्लीतील रिलायन्स आणि टाटा मॉलसह मोठ्या रिटेल चेनला विकली.
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या अडचणीत वाढ! गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली पुनर्विचार याचिका
या केळीमध्ये आरोग्यासाठी फायदेशीर असणारे बीटा-कॅरोटीन मोठ्या प्रमाणात असून त्याची किंमत 55 ते 60 रुपये प्रति किलो इतकी आहे. त्याने चार एकर शेतीतून 60 टन लाल केळीचे उत्पन्न घेतले असून त्याला त्यातून 35 लाखांचे उत्पन्न मिळाले. भारतात या केळीला मागणी नसली तरी त्याची मेट्रो शहरांमध्ये चांगली मागणी आहे.
“मातोश्रीच्या वहिणींना दोन भाऊ एकत्र येण मान्य आहे का?” ‘या’ नेत्याचा खोचक सवाल
हे ही पहा