
बदलापूरमध्ये (Badlapur) मनाला सुन्न करणारी घटना घडली आहे. घडल अस की मित्राच्या वाढदिवसानिमित्त (birthday) चार तरुण कोंडेश्वर धबधब्यावर (At Kondeshwar Falls) फिरण्यासाठी आले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही पाण्यात बुडूले (Drowned in water). या प्रकरणी माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चौघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
दिलासादायक! पुढील ४८ तासांत मिळणार मान्सूनपासून सुटका
याप्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात (Kulgaon Police Station) अपघाची मृत्यू नोंद करण्यात आली आहे. हे चौघेही मित्र मुंबईतील घाटकोपर परिसरातील रहिवासी आहेत. मयत तरुणांमध्ये स्वयंम बाबा मांजरेकर, आकाश राजू झिंगा, सूरज मच्छिंद्र साळवे, लिनस भास्कर उच्चपवार हे चार मित्र होते.
घरच्या घरी सोप्या पद्धतीने मुरघास कसा तयार करावा? वाचा सविस्तर माहिती
नेमकी घटना काय घडली?
आकाश झिंगा या मित्राच्या वाढदिवसानिमित्त मयत चार मित्र आणि बचावलेला तरुण प्रतीक हाटे असे पाच मित्र मिळून अंबरनाथमधील कोंडेश्वर धबधब्यावर फिरायला गेले होते. यावेळी धबधब्यात पाण्यात पोहण्यासाठी स्वयंम, आकाश, सूरज आणि लिनस हे चौघे उतरले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेजण बुडू लागले.
तेव्हा प्रतीकने त्याच्या चार मित्रांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा प्रयत्न निष्फळ ठरला आणि त्याचे चार मित्र पाण्यात बुडाले. दरम्यान स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले. याबाबत कुळगाव पोलिसांना याची माहिती देण्यात आली. दरम्यान चौघांचे मृतदेह बदलापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.