Site icon e लोकहित | Marathi News

राज्यात एकूण 182 कारखाने सुरू, गाळप हंगाम तेजीत; शेतकऱ्यांना होणार फायदा

A total of 182 factories are open in the state, the dry season is booming; Farmers will benefit

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर राज्यसरकारने नुकत्याच त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सध्या राज्यातील बहुतेक कारख्यान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू झालाय. यामध्ये 7 डिसेंबर अखेर पर्यंत एकूण 182 कारख्यान्यांचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे २८४ लाख टन उसाचे गाळप होऊन २५२ लाख क्विंटल साखर उत्पादन ( Sugar Production) झाले आहे. यासाठी दररोज सरासरी आठ लाख टन क्षमतेने गाळप सुरू आहे. याबाबतची माहिती साखर आयुक्तांनी दिली आहे.

धक्कादायक! वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार; वाचा सविस्तर

सोलापूर विभागात एकूण 45 कारखाने सुरू असून येथे साखरेचे गाळप सगळ्यात आघाडीवर सुरू आहे. यानंतर कोल्हापूर विभागात ३४ कारखाने सुरू आहेत तर पुणे विभागात २८ कारखाने सुरू आहेत. याशिवाय नांदेड विभागात २६, नगर विभागात २४, औरंगाबाद विभागात २०, नागपूर विभागात 3 कारखाने सुरू आहेत. खरंतर अमरावती विभागात सगळ्यात कमी म्हणजे फक्त दोन कारखाने सुरू झाले आहेत. गाळप आणि साखर उत्पादनात देखील सोलापूर विभागच आघाडीवर आहे.

भाजपची मोठी घोषणा! ‘हे’ असणार गुजरातचे नवीन मुख्यमंत्री

मागच्या वर्षी राज्यात एकूण 200 कारखाने सुरू होते. त्यामुळे अजूनही काही कारखाने सुरू होणे बाकी आहे. या पार्श्वभूमीवर ” यंदा गाळप हंगाम उशिरा सुरू झाला असला तरी, खोडवा उसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हंगाम वेळेत पूर्ण होईल व शिल्लक ऊसाची समस्या जाणवणार नाही. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरांना आलेला भाव व इथेनॉल असणारा चांगला दर यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.” असे साखर आयुक्त शेखर गायकवाड ( Shekhar Gaikwad) यांनी सांगितले आहे.

बिग ब्रेकिंग! बस पेटून तिघांचा मृत्यू तर अनेकजण गंभीर जखमी

Spread the love
Exit mobile version