
Accident News । वाहतुकीच्या नियमात बदल करूनही अपघाताचा ससेमिरा अजूनही थांबला नाही. दररोज कोठे ना कोठे अपघात झाल्याचे आपण पाहतो, ऐकतो. काही अपघात चालकांच्या चुकीने होतात तर काही वाहतुकीचे नियम (Traffic rules) मोडल्याने होतात. अपघातात काहींना आपला जीव गमवावा लागतो, तर काहींना कायमचे अपंगत्व येते. परंतु, अपघातांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात. (Wardha Accident News)
असाच एक भीषण अपघात वर्धा जिल्ह्यात (Wardha Truck Scooty Accident) झाला आहे. जिल्ह्यातील आर्वी शहरातील एचडीएफसी बॅकेसमोर घटना घडली आहे. शाळेत शिकत असणाऱ्या लहान बहिणीला भेटण्यासाठी स्कुटीवरून जात असणाऱ्या मोठ्या बहिणीला ट्रकने (Truck Scooty Accident) चिरडले. प्रियाक्षी रमण लायचा (वय १९ वर्ष) असे या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. अपघातानंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. प्रियाक्षी ही तंत्रनिकेतन पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होती.
ती कृषक कन्या शाळेत शिकत असणाऱ्या लहान बहिणीला आधार कार्ड आणि ३० रुपये देण्यासाठी दुचाकीवरून जात असताना मुख्य मार्गावरील बँकेसमोर समोरून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक (Accident) दिली. ही धडक इतकी जोरात होती की ट्रकच्या समोरील चाकाखाली आली आणि ट्रकने जागीच चिरडले. अपघातांनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त नागरिकांनी ट्रकची तोडफोड केली. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.