
दिल्ली : आज १७ सप्टेंबर रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा वाढदिवस आहे. परंतु या वर्षी वाढदिवस (Birthday) साजरा करण्यासाठी नरेंद्र मोदी भारतात नाहीत. पण तरी देखील त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते मोदींचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान आजच्या दिवशी संपूर्ण देशात विविध विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी रक्तदान शिबीर तसेच सेवा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. दरम्यान तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) इतर राज्यांपेक्षा जरा वेगळच आणि विशेष सेलिब्रेशन (celebration) पाहायला मिळणार आहे.
कारण तामिळनाडू राज्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आजच्या दिवशी म्हणजेच मोदींचा वाढदिवसा दिवशी (१७ सप्टेंबर) जमनाला येणाऱ्या नवजात बालकांना (Newborns) चक्क सोन्याची अंगठी (gold ring) देण्यात येणार आहे. ही भेटवस्तू जनतेसाठी अतिशय मोलाची ठरणार आहे. प्रत्येक अंगठी जवळपास २ ग्रामची असेल आणि तिची किंमत पाच हजार रुपये इतकी असेल. दरम्यान चेन्नईस्थित आरएसआरएम हे शासकीय रुग्णालय यासाठी निवडण्यात आले आहे. याबरोबरच तब्बल ७२० किलोचे मासेही वाटले जाणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे भाजपाच्या स्थानिक युनिटच्या अंदाजानुसार १७ सप्टेंबरला या रुग्णालयात १० ते १५ बालकांचा जन्म होऊ शकतो.
दरम्यान मत्स्य पालन आणि सूचना व प्रसारण राज्य मंत्री एल.मुरुगन यांनी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली आहे. एल.मुरुगन यांनी सांगितले की ,”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा दिवशी आरएसआरएम शासकीय रुग्णालयात जन्माला येणाऱ्या नवजात बालकांना भेट म्हणून सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. तसेच ही भेट देऊन आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी जन्माला येणाऱ्या बालकांचे स्वागत करायचे आहे.’ अस देखील एल.मुरुगन म्हणाले.
Cheetah Is Back: तब्बल 70 वर्षांनंतर नामिबियातून भारतात आले आठ विदेशी चित्ते