मुख्यमंत्र्यांचे पोस्टर फाडले म्हणून कुत्र्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल!

A police complaint was filed against the dog for tearing the Chief Minister's poster!

रस्त्यावर असणारे पोस्टर्स कुत्र्यांकडून अनेकदा फाडले जातात. मात्र अशाप्रकारे पोस्टर फाडणे एका कुत्र्याला चांगलेच महागात पडले आहे. आंध्रप्रदेशमध्ये मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी ( Jagan Mohan Reddy) यांचे पोस्टर फाडल्याबद्दल कुत्र्यावर कारवाई करण्यात आली आहे. घराच्या भिंतीवर असणारे हे पोस्टर कुत्र्याने फाडले म्हणून कुत्र्यावर थेट पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पोस्टर फाडतानाचा कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. ( Viral Video) हा व्हिडिओ पाहूनच कुत्र्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कष्टकरी नवरा बायकोचे स्वप्न झाले साकार; एकाचवेळी दोघेही बनले पोलीस अधिकरी

दासरी उदयश्री यांनी ही तक्रार केली असून त्यांनी मुख्यमंत्र्यांचा अवमान करणारा कुत्रा व त्यापाठीमागे असणाऱ्या इतर लोकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत पक्षातील इतर महिला देखील उपस्थित होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षाने १५१ विधानसभा जागा जिंकल्या याचा प्रचंड आनंद आहे. याबद्दल आम्हाला मुखमंत्र्यांचा फार आदर वाटतो.

VIDEO: हार्दिक पांड्याचे मैदानातील वर्तन पाहून चाहते नाराज; मैदानावरच केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

परंतु, अशा नेत्याचे पोस्टर फाडून अनादर करणाऱ्या कुत्र्याने सहा कोटी लोकांना दुखावले आहे. आमच्या लाडक्या नेत्याचा अपमान करणाऱ्या कुत्र्याला आणि त्याच्यासोबत असणाऱ्या लोकांना अटक करण्याची विनंती आम्ही पोलिसांना केली आहे. याआधी देखील जगन मोहन रेड्डी यांचा फोटो असलेले स्टिकर कुत्र्याने फाडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक, ‘या’ जिल्ह्यांना जास्त धोका!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *