Site icon e लोकहित | Marathi News

दौंड तालुक्यातील बाप-लेकाची कमाल, खेकड्याची शेती करून मिळवतायेत लाखो रुपये

A maximum of Bap-Lekas ​​in Daund taluka earn lakhs of rupees from crab farming

दौंड : आपला भारत देश हा कृषिप्रधान देश (Agricultural country) आहे. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पिकांची शेती केली जाते. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक व्यवसाय केले जातात. दरम्यान त्यातूनच भरपूर उत्पादन काढून पैसे मिळवले जातात. पण जरी शिक्षण (Education) हा माणसाचा तिसरा डोळा असला तरी देशातील अनेक तरुण चांगल्या चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेत आहेत. दरम्यान अशातच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एका बाप लेकाच्या जोडीनं खेकड्याची शेती (Crab farming) करून कमाल केली आहे.

दिलासादायक! पुढील ४८ तासांत मिळणार मान्सूनपासून सुटका

या खेकड्याच्या व्यवसायातून त्यांनी भरपूर नफा मिळवला आहे. बाप लेकाच्या या व्यवसायाची संपूर्ण पंचक्रोशीत जोरदार चर्चा सुरू आहे. या जोडीमध्ये पित्याचे नाव राजेंद्र ननावरे व मुलाचे नाव कुलदीप ननावरे असं आहे. महत्वाची बाब म्हणजे भरघोस नफा मिळावा या उद्देशाने या दोघांनी शेतात खेकड्याची शेती सुरू केली आहे. सध्याच्या परिस्थितीत या दोघा बाप लेकांना खेकड्याच्या शेतीतून नफा होतं आहे.

मित्राच्या वाढदिवसानिमित्त फिरायला जाणे पडले महागात, धबधब्याच्या पाण्यात बुडून चार मित्रांचा मृत्यू

सगळे तरुण या दोघांकडे आदर्श म्हणून पहात आहेत. इतकंच नाही तर अनेक जण त्यांच्या शेतीची पाहणी करण्यासाठी देखील येतं आहेत. महत्वाची बाब म्हणजे सध्या राज्यात खेकड्यांची मागणी वाढली आहे. मात्र, जेवढी मागणी आहे तेवढा खेकड्यांचा पुरवठा होत नसल्याचे लक्षात येतं आहे.

खडकी येथील श्री गणेश सहकारी संस्थेच्या वतीने दिवाळीनिमित्त दूध उत्पादकांना साखर वाटप

Spread the love
Exit mobile version