
दिल्ली : अमेरिकेत वास्तव्यास असलेले भारतीय वंशाचे रिचमंड गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट लोकेश व्युरु यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi) रेड्डी (Reddy) आणि अदानी (Adani) यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल भ्रष्टाचार आणि पेगासस हेरगिरीसह अनेक गोष्टींबाबतहा करण्यात आला आहे. कोलंबियाच्या जिल्हा न्यायालयाकडून या प्रकरणी या तिन्ही नेत्यांसह इतर अनेकांना 4 ऑगस्ट रोजी समन्स बजावण्यात आले आहे.
Prashant Bamb: “…ते आमच्या पिढ्या बरबाद व्हायला कारणीभूत”, आमदार प्रशांत बंब यांचे वादग्रस्त वक्तव्य
गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी कोणत्याही कागदपत्राशिवाय आणि पुराव्याशिवाय आंध्र प्रदेशातून आलेल्या भारतीय-अमेरिकन डॉक्टरकडून केस दाखल केली गेली आहे. त्याचवेळी न्यूयॉर्कचे वकील रवी बत्रा यांनी या केसला ‘निरर्थक केस’ अशी टीका केली आहे. याप्रकरणी एकही वकील बाजू मांडण्यासाठी न्यायालयात उभा नसल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष प्रोफेसर क्लॉस एम. श्वाब यांचेही नाव असल्याचे सांगण्यात आले आहे.
झारखंडच्या राज्यपालांकडून JMM शिष्टमंडळाने मागितली भेटीची वेळ, 4 वाजता होणार भेट
न्यायालयाकडून 4 ऑगस्ट रोजी समन्स
24 मे रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता, या प्रकरणी न्यायालयाकडून 22 जुलै रोजी समन्स जारी करण्यात आले होते. भारतातही परदेशातील या न्यायालयाकडून 4 ऑगस्ट रोजी हे समन्स पाठवण्यात आले आहे. रवी बत्रा यांनी सांगितले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेड्डी आणि अदानी यांच्यासह अनेकांकडून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कॅश ट्रान्स्फर केली जात आहे. तसेच राजकीय विरोधकांविरोधात पेगासस स्पायवेअरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.असा दावा डॉक्टरकडून करण्यात आला होता.
Abdul Sattar: कृषिमंत्री सत्तार मेळघाट दौऱ्यावर असतानाच शेतकऱ्याची आत्महत्या, कारण…
विदेशी सार्वभौम कायद्याचा गैरवापर
या प्रकरणात त्यांनी 53 पानांची तक्रारी दाखल करुन फेडरल न्यायालयांचा गैरवापर करत आहेत. यामुळे भारताची बदनामी आणि अपमान करण्यासाठी त्यांनी विदेशी सार्वभौम कायद्याचा गैरवापर तसेच न्यायालयाचा वेळ वाया घालवत असल्याची टीका करण्यात आली आहे.