
एमपीएससी ( MPSC Exam) देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच 8 हजार 169 पदांसाठी जाहिरात काढली आहे. दरम्यान महाराष्ट्र अराजपात्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून ही पदे भरली जाणार आहेत. आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
धक्कदायक! पेपर लिहीत असतानाच ९ वर्षीय मुलीचा मृत्यू
यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी यांची 70 पदे भरली जाणार आहेत. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील 8 पदे भरली जाणार आहेत. वित्त विभागाचे राज्य कर निरीक्षक 159 पदे तर गृह विभागाच्या पोलीस उपनिरीक्षकाची 374 पदे भरली जातील. गृह विभागाच्या दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचे एकूण 6 पदे भरली जाणार आहेत. याशिवाय वित्त विभाग तांत्रिक सहाय्यक एक जागा असणार आहे व वित्त विभागाच्या कर सहाय्यक 468 पदे भरली जाणार आहेत.
गरोदरपणातही ऊसाच्या फडात काम करणाऱ्या महिलांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली दखल
महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाच्या महाराष्ट्रातील विविध कार्यालयात लिपिक टंकलेखनाच्या 7034 जागा या दरम्यान भरल्या जाणार आहेत. मंत्रालयातील प्रसाशकीय विभाग तसेच राज्य शासनाच्या (State Government) विविध कार्यालयासाठी या जागा भरल्या जाणार आहेत.
सेल्फी घेण्यासाठी चढला ‘वंदे भारत’ ट्रेनमध्ये अन् घडलं भलतंच; वाचून व्हाल थक्क