
दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. सध्या पुणे सोलापूर महामार्गावर (Pune Solapur Highway) भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव वेगाने जाणारी स्कॉर्पिओ गाडी उलटल्यामुळे हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये श्रीगोंद्यातील (Shrigonda) ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
रामदेव बाबा यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे; सुषमा अंधारे यांची मागणी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डाळज क्र. 3 (ता. इंदापूर) पुणे सोलापूर महामार्गवर बुधवारी दिनांक १८ जानेवारी २०२३ रोजी पहाटे हा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहनातून बाहेर काढण्यात आले. व जखमींना भिगवणच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे.
अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी घेतली शंभूराजे देसाई यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण