
मुंबई : चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांचा शिंदे सरकारमध्ये समावेश झाल्यानंतर भाजपच्या प्रदेशाक्षपदी कोणाचे नाव असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांची निवड करण्यात आली. त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच भाजपचे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे.
आज संध्याकाळी यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात येईल. बावनकुळे हे ओबीसी नेते आहेत. त्यामुळे फायदा भाजपला येत्या काळात होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच बावनकुळे यांनी त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिल्याच्या वृत्ताला दुजोराही दिला आहे.
चंद्रकांत पाटील हे राज्यात कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांचं प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे जाणार याचा जोरदार चर्चा चालू होत्या. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि राम शिंदे या दोन्ही नावाच्या चर्चा रंगत होत्या. बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळीक असल्यामुळे बावनकुळेंची निवड प्रदेशाध्यक्षपदी करण्यात आली.