
आपल्या आसपास अनेक धक्कदायक घटना घडत असतात. आता अशीच एक अजब गजब घटना समोर आली आहे. सध्या उत्तर प्रदेशातून एक विचित्रच घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) बदायू येथे एका तरुणाने उंदराचा जीव घेतल्याने तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे.
संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चाना उधाण
या प्रकरणामध्ये पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेला तरुण हा उंदराच्या जीवाशी खेळत होता. त्याने त्याला बांधून एका नाल्यात डुबवित होता. हा सर्व प्रकार एका दुसऱ्या तरुणाने पहिला, त्याला विरोध देखील केला पणतो तो काही थांबला नाही त्यामुळे तरुणाने याविरोधात तक्रार दाखल केली.
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्यासाठी पाळावी लागणार ‘ही’ अट
या उंदराचा मृत्यू नेमका कसा झाला, याचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी त्याचे शवविच्छेदन (Postmortem) करण्याचा निर्णय देखील घेतलाय. यात याचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.