
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आमदारांसह आज गुवाहाटीसाठी निघाले आहेत. गुवाहाटीला महाराष्ट्रातील राजकीय भुकंपाचे केंद्र बिंदू मानले जात आहे. माहितीनुसार गुवाहाटीतील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात ते विशेष पूजा देखील करण्यात येणार आहे. आता यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“अमृता फडणवीस 100 वर्ष म्हाताऱ्या होणार नाहीत”, रामदेव बाबांचे विधान चर्चेत
अजित पवार म्हणाले, “माझ्या पत्रकार मित्राने मला एक बातमी दिली. मागच्या वेळी शिंदे गट गुवाहाटीला गेला हॉटेलमध्ये राहिले पण बिल दिले नाही. त्यामुळे हॉटेलच्या मालकाने आत्महत्या केली. आता ही बातमी खरी का खोटी माहित नाही.आता शिंदे गट कामाख्या देवीच्या पूजेला जाणार आहे. काही ठीकाणी आपण बकरा कापतो, कोंबडं कापतो. पण गुवाहाटीला रेडा कापतात असं म्हणतात. रेड्याचा बळी देतात. त्यामुळे शिंदे गट कोणाचा बळी द्यायला चालले माहित नाही”
Shikhar Dhawan: शिखर धवनच्या ‘त्या’ एका चुकीमुळे झाला भारतीय संघाचा पराभव
जून 2022 एकनाथ शिंदे आणि काही आमदार घेऊन गुवाहाटीला शिवसेनेविरुद्ध (Shivsena)बंड करण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी गेले होते. नंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आणि आता त्यांचे सरकार असून ते मुख्यमंत्री झाले आहेत. आता एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाऊन देवीचे दर्शन घेणार आहेत.