बिग ब्रेकिंग! मंत्रालयामध्ये तरुणाने केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न; नेमकं काय असेल कारण?

Big Breaking! Youth attempts suicide in Mantralaya; What exactly would be the reason?

बीड (Beed) जिल्ह्यातील एका तरुणाने मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. बापू नारायण मोकाशी (Bapu Narayan Mokashi) असे या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणाने सहाव्या मजल्यावरुन उडी मारली पण मंत्रालयामध्ये लावण्यात आलेल्या जाळीमध्ये तो तरुण अडकला आणि जीव वाचला.

“राहुल गांधींचा विचार गाडल्याशिवाय राहणार नाही” – देवेंद्र फडणवीस

मंत्रालयामध्ये (ministry) याआधी देखील अनेक लोकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर मंत्रालयात या घटनेमध्ये तरुणाच्या डोळ्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

‘सुषमा अंधारे तुम्ही आडनाव बदलून सुषमा आगलावे करा’ – आशिष शेलार

तरुणाने नेमका आत्महत्या (suicide) करण्याचा प्रयत्न का केला याबाबतची माहिती मात्र अजून समोर आलेली नाही. या घटनेमुळे मंत्रालय परिसरात गोंधळ उडाला होता. पण उपचारासाठी त्याला दवाखान्यात नेत असताना पोलिसांनी त्याला आत्महत्येचं कारण विचारलं असता. त्याने सांगितले की, “प्रेयसीवर बलात्कार झाला असून, न्याय मिळाला नसल्याचं म्हटलं आहे. आता याप्रकरणी पोलीस यंत्रणा तपास करत आहे.

ब्रेकिंग! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपचा कारभार आता संध्या देवनाथन पाहणार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *