शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! उसाचे वजन आता मोफत करून मिळणार; ‘या’ नेत्याने घेतला मोठा निर्णय

Good news for farmers! Weighing of sugarcane will now be done free of charge; 'This' leader took a big decision

राज्यात ऊस उत्पादन शेतकऱ्यांच्या मागणीसाठी नुकतेच आंदोलन झाले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ( Raju Shetti ) यांनी कारखान्यातील वजन काटे ऑनलाइन करण्याची मागणी केली होती. काटा मारून कारखानदार शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याचा आरोप यादरम्यान करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे ( Charanraj Chavre) यांनी पेनुर येथे स्वखर्चातून वजन काटा बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

फॉर्म १०A सबंधी आयकर विभागाचा आऊटरिच कार्यक्रम पार पडला!

राज्यातील कारखानदार वजनात काटा मारून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असल्याचे पहायला मिळत आहे. चरणराज चवरे हे स्वतः शेतकरी आहेत. त्यामुळे ते शेतकऱ्यांची ही अडचण नक्कीच समजतात. यामुळे चवरे यांनी वजनकाटा ( online weight system for sugarcan ) बसविण्याचा निर्णय घेतला. हा काटा बसवण्यासाठी किमान 10 लाखांचा खर्च येणार आहे.

आदित्य ठाकरेंनी थेट जेजुरीत जाऊन भंडारा उधळला; कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत

पंढरपूर आळंदी या पालखी मार्गावरील पेनुर नजीक हा काटा बसविण्यात येणार आहे. एकूण 50 टन क्षमतेचा हा काटा असणार आहे. चवरे यांच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होणार आहे. शेतकरी, ऊस तोडणी मजूर व वाहन मालक यांनी चवरे यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *