मोठी बातमी! कुरकुंभ एमआयडीसीतील शोगन कंपनीत भीषण आग

Big news! Massive fire at Shogun Company in Kurkumbh MIDC

दौंड : कुरकुंभ एमआयडीसीतुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केमिकल बनविणाऱ्या शोगन कंपनीत रिएक्टरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची घटना घडली आहे. आज दुपारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे.

तिरुपती मंदिराच्या एकून संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क; वाचा सविस्तर

ही आग एवढी भीषण होती की कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही तांत्रिक दोषामुळे रिएक्टरचा स्फोट होऊन आग लागली. पण सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

“गुटखा खा, दारू प्या,आयोडेक्स खा पण…”; भाजपा नेत्याचं वक्तव्य चर्चेत

ही आग लागल्याची समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवळपास अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. दरम्यान, कुरकुंभ एमआयडीसीत अशा घटना नेहमीच घडत असतात. त्यामुळे प्रतिबंधासाठी दिर्घकालीन सुरक्षा आणण्याची देखील आवश्यकता आहे.

तरुणांसाठी आनंददायक बातमी! राज्यात 18 हजारांपेक्षा जास्त पोलीस पदांची भरती; असा करा अर्ज

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *