शेतात पिकांवर फवारणी करताना सावधान! 55 वर्षीय शेतकरी महिलेचा औषध फवारणी करताना झाला मृत्यू

Be careful when spraying crops in the field! A 55-year-old farmer woman died while spraying medicine

शेतकरी शेतात आपल्या पिकांवर (crops) औषधांची फवारणी करतात. परंतु सावधान, कारण शेतात कांद्यांचा रोपांवर (Onion plants) फवारणी करतांना फवारणीचे औषध (Spray medicine) अंगावर पडल्याने एका 55 वर्षीय शेतकरी महिलेचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना धुळे (Dhule) जिल्ह्यातील देऊर गावात घडली. दरम्यान या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कांद्यांचा रोपांवर फवारणी करतांना फवारणीचे औषध अंगावर पडल्यावर त्या महिलेला नातेवाईकांनी धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्या महिलेला मृत (dead) घोषित केले.

ब्रेकिंग! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल 29 वर्षीय विद्यार्थ्याला अटक

निमलाबाई अशोक पाटील असं या मृत महीलेच नाव आहे. शेतात कांदा रोपांवर फवारणी करत असताना फवारणी पंपाचे नोझल अचानक निघाले.द रम्यान फवारणीचे औषध निमलाबाई यांच्या अंगावर पडले. त्यानंतर निमलाबाई यांना प्रचंड त्रास होऊ लागला. दरम्यान त्यांना धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात नातेवाईकांनी दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान या घटनेची धुळे तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तसेच या घटनेचा पुढील तपास पाेलीस करत आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंददायक! ‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळाला 3500 रुपये दर

कृषी विभागाकडून फवारणीवेळी काळजी घेण्याचे आवाहन –

या घटनेमुळे कृषी विभागाने शेतात पिकांवर मोठ्या प्रमाणात फवारणी केली जाते. शेतात पिकांवर फवारणी करतांना केलेल्या मार्गदर्शित सूचनांचं पालन करावे, फवारणी करताना पुरेशी काळजी घ्यावी, या गोष्टी पुन्हा अधोरेखित झाल्या आहेत. इतकंच नाही तर फवारणी करताना पुरेशी खबरदारी घेण्याचे आवाहन देखील कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर भावना व्यक्त करताय? तर सावधान, नाहीतर होईल ‘ही’ कारवाई

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *