‘सैराट’मधील लंगड्या आणि सल्या दिसणार ‘या’ चित्रपाटाच्या मुख्य भूमिकेत

Langdya and Salya from 'Sairat' will be seen in the lead role of this movie

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी हळूहळू प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. सध्या या चित्रपटसृष्टीतून वेगवेगळ्या विषयांवर मग यामध्ये विनोदी, ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक, शालेयजीवन तसेच प्रेमकथांवर आधारित चित्रपट (movie) येत आहेत. त्यामुळे या मराठी चित्रपटांनाही प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. दरम्यान अशातच आता ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ‘एकदम कडक’ (Ekdam Kadak) या मराठी चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

आली आली दिवाळी! चेहऱ्यावर नॅचरल चमक आणण्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती उटणे

‘सैराट’ चित्रपटामध्ये (Sairat movie) लंगड्याची भूमिका साकारणारा तानाजी गलगुंडे (Tanaji Galgunde) व सल्याची भूमिका करणारा अरबाज शेख (Arbaaz Sheikh) हे दोघंही ‘एकदम कडक’ या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. तसेच या चित्रपटात ‘अभिनेता पार्थ भालेराव’, चिन्मय संतही चित्रपटामध्ये महत्त्वाचं पात्र साकारताना दिसतील. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये तरुण कलाकारांची पिढी धुमाकूळ घालणार असल्याचं पाहायला मिळेल. येत्या 2 डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.

आयएएस अधिकाऱ्याने 21 वर्षीय महिलेला नोकरीचे आश्वासन देत केले ‘हे’ कृत्य

विशेष म्हणजे या चित्रपटाचे पोस्टर बघतच क्षणी हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर चित्रपटाची कथा आधारित असल्याचं दिसून येत आहे. महत्वाची बाब म्हणजे या चित्रपटाच्या पोस्टरवरील मुलं नेमकं कोणत्या मुलीकडे पाहतात? दरम्यान ही अभिनेत्री कोण? हे सध्यातरी गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन गणेश शिंदे यांनी केले आहे. तर या चित्रपटाची पटकथा आणि संवाद कल्पेश जगताप यांचे असून चित्रपटाच्या संगीताची बाजू नरेंद्र भिडे, पंकज पडघन यांनी सांभाळली आहे. इतकंच नाही तर सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, उमेश गवळी, सायली पंकज, सौरभ साळुंके यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत.

दूध खरेदी दरामध्ये वाढ! ‘या’ दूध संघाने दिली दूध उत्पादकांना दिवाळी भेट

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *