
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. दमदार अभिनय आणि हटके स्टाईलमुळे तो अनेक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्याचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. सध्या अक्षय कुमार त्याच्या एका व्हिडीओमुळे खूप चर्चेत आला आहे.
अक्षय कुमार त्याचा आगामी चित्रपट ‘रक्षाबंधन’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रक्षाबंधनचे अवचित्य साधून त्याचा हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रेक्षांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन साठी त्यांची संपूर्ण टीम पुण्यात (Pune) गेली होती. यावेळी, पुण्यातील ‘श्रीमंत मिसळ आणि बरंच काही’ येथे रक्षाबंधनच्या संपूर्ण टीमने मिसळ पावचा आस्वाद घेतला. इतरांप्रमाणेच झणझणीत मिसळ खाण्याचा मोह अक्षयलाही आवरता आला नाही, हे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
अक्षय कुमारने पुण्यात मिसळ पाव खाल्यानंतर इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या रक्षाबंधन टीमचा फोटो शेअर केला आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, ‘प्रत्येक पुणेकराची जान आणि शान, मिसळपाव! हृद्यानंतर आता आमचे पोटही पूर्णपणे भरले आहे. श्रीमंत मिसळ आणि बरंच काहीचे धन्यवाद. खूप छान’, सध्या सोशल मीडियावर अक्षय कुमारचा मिसळ खातानाचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. चाहते यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.