
दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (Elon Musk) आता परफ्यूम सेल्समन बनले आहेत. तसेच मस्क हे ट्विटरवर परफ्यूमच्या (perfume) बॉटल विकत आहेत. जर तुम्ही विचार करत असाल की हे खोटे आहे तर तुम्ही त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटला (Twitter account) भेट देऊ शकता. ट्विटरच्या बायोमध्ये त्यांनी ‘परफ्यूम सेल्समन’ असे लिहिले आहे. वास्तविक मस्क यांनी एक परफ्यूम लॉन्च केला आहे. खुद्द एलोन मस्कने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. एवढेच नाही तर त्यांनी स्वत: लोकांना त्यांचे परफ्यूम खरेदी करण्याची विनंती करत आहे.
धक्कादायक! पत्नीशी वाईट बोलणाऱ्या व्यक्तीवर पतीने केला चाकूने हल्ला
ट्विटरच्या पोस्टमध्ये, मस्क यांनी त्यांच्या ‘द बोरिंग कंपनी’ या उपक्रमाद्वारे ‘बर्न हेअर’ परफ्यूम लॉन्च केला आहे. पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या परफ्यूमला ‘पृथ्वीवरील सर्वोत्तम सुगंध म्हटले आहे. परफ्यूम लाँच झाल्यानंतर, मस्क यांनी ट्विटरवर त्यांचे बायो बदलले आहे. बायोमध्ये आता ‘परफ्यूम सेल्समन’ अस करण्यात आल आहे.
या गावात चक्क 1000 वर्षांपासून केली जाते मांजरांची पुजा, कारण ऐकून होताल आश्चर्यचकित
एलोन मस्क हे लोकांना परफ्यूम विकत घेण्याचे आवाहन करत आहेत. मस्क यांनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, ‘माझ्यासारख्या नावाने परफ्यूम व्यवसायात येण्याचे ठरले होते, ‘मी हे इतके दिवस का थांबवले?’ त्याच वेळी, दुसर्या ट्विटमध्ये, टेस्लाचे सीईओ लोकांना त्यांचे परफ्यूम खरेदी करण्याचे आवाहन करतात. ते लिहितात की, ‘कृपया माझे परफ्यूम खरेदी करा जेणेकरून मी ट्विटर खरेदी करू शकेन.’
दिव्यांगांना बसमध्ये मिळणार मोफत प्रवास, ‘ही’ कागदपत्र आवश्यक
‘एवढी’ आहे परफ्यूमची किंमत
एलोन मस्क यांनी त्यांच्या ट्विटरवर कंपनीच्या वेबसाइटची लिंकही शेअर केली आहे. ‘बर्न हेअर’ परफ्यूमची वेबसाइटवर किंमत $100 आहे. भारतीय ग्राहकांसाठी त्याची किंमत 8,400 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच भारतीय ग्राहकांना 11,400 रुपये द्यावे लागतील कारण आंतरराष्ट्रीय शिपिंग शुल्क 300 रुपये असेल. एलोन मस्क सतत ट्विट करत त्याच्या विकल्या गेलेल्या परफ्यूमच्या शिश्यांची संख्या सांगत आहे. आतापर्यंत 20 हजार शिश्यांची विक्री झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
Engineering: राज्य सरकारचा मोठा निर्णय! इंजिनीयरींगचे शिक्षणही आता मिळणार मराठीतून