Gautami Patil । अपघातप्रकरणी रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी मागितले ‘इतके’ लाख रुपये; गौतमीने केला धक्कादायक खुलासा

Gautami Patil

Gautami Patil । पुण्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या रिक्षा अपघाताच्या प्रकरणात प्रसिद्ध लोकनृत्यांगना गौतमी पाटील हिचं नाव सध्या जोरात चर्चेत आहे. या अपघातात तिच्या गाडीच्या ड्रायव्हरने रिक्षाला जोरदार धडक दिली होती. या प्रकरणानंतर गौतमीवर गंभीर आरोप करण्यात आले की, अपघात झाल्यानंतर तिने रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांना मदत केली नाही. मात्र आता गौतमीने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू ठामपणे मांडली आहे.

गौतमीने स्पष्ट सांगितले की, अपघातावेळी ती गाडीत नव्हतीच. पोलिसांनीही सीसीटीव्ही फुटेज तपासून याबाबत तिला निर्दोष ठरवलं आहे. “मी त्या दिवशी मुंबईत होते, आणि माझ्या चालकाशी अजूनही माझं बोलणं झालेलं नाही. पोलिसांना सगळी माहिती दिली आहे आणि पुढे कायदेशीर मार्गाने सगळं पार पाडलं जाईल,” असं ती म्हणाली.

या अपघातानंतर रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांनी १९ ते २० लाख रुपयांची मागणी केली होती, असा गौतमीचा दावा आहे. “माझ्या भावांनी त्यांना तत्काळ मदतीसाठी संपर्क केला होता, पण त्यांनी ती मदत नाकारली आणि मोठ्या रकमेची मागणी केली,” असं गौतमीने सांगितलं.

गौतमीने तिच्या ड्रायव्हरची चूक मान्य केली आहे, पण स्वतःला या घटनेशी थेट संबंध नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. “माझी काहीही चूक नसताना मला सोशल मीडियावर सतत ट्रोल केलं जातं. मी नाचते तेही लोकांना खटकतं, आणि नाचत नाही तेव्हा तरी टीका होतेच,” असं सांगत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.

तिने असंही सांगितलं की, या प्रकरणामुळे तिचे शोज बंद झाले तर अनेक कामगार आणि टीमचे सदस्य बेरोजगार होतील. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून ती आपलं काम करत राहणार आहे. “चंद्रकातदादांनी जे वक्तव्य केलं, त्यामुळे मला वाईट वाटलं. पण सगळेच लोक माझ्याबद्दल वाईटच बोलतात. तरी मी न्याय मिळेपर्यंत लढत राहणार,” असं भावनिक वक्तव्यही तिने केलं.

Spread the love