Ajit Pawar । माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत निळकंठेश्वर पॅनलची आघाडी; अजित पवार गट विजयी घोडदौडीत

Ajit Pawar

Ajit Pawar । माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते आणि पहिल्या टप्प्यातच निळकंठेश्वर पॅनलने मिळवलेल्या आघाडीमुळे अजित पवार गटाला मोठा श्वास मिळाला आहे. पहिल्या फेरीतील मतमोजणी मध्यरात्री दीड वाजता पूर्ण झाली असून, त्यानंतरच्या आकडेवारीनुसार अजित पवारांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलचे तब्बल १७ उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचेही चार उमेदवार आघाडीवर असून, ही लढत अत्यंत चुरशीची ठरते आहे.

Hiradgaon News । शालेय पोषण आहारात त्रुटी; हिरडगाव शाळेतील मसाले कालबाह्य

या निवडणुकीत अजित पवारांनी स्वतः ‘ब वर्ग’ गटातून एकमेव उमेदवार म्हणून विजय मिळवला आहे. ही विजयी सुरुवात त्यांच्या पॅनलसाठी महत्त्वपूर्ण ठरत असून, त्यांच्या प्रभावामुळे संपूर्ण गटातील चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसऱ्या फेरीची मतमोजणी पहाटे साडेपाच वाजता सुरू झाल्याने, अंतिम निकाल दुपारनंतर स्पष्ट होईल. मात्र आतापर्यंतच्या कलानुसार अजित पवार गटाचे पारडे जड दिसत आहे.

Municipal Elections । महापालिका निवडणुकांबाबत सर्वात मोठी बातमी! प्रभाग रचनेच्या वेळापत्रकाने राजकीय हालचालींना वेग

सांगवी, बारामती आणि महिला गटांमध्ये देखील जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. सांगवीमध्ये माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रणजित खलाटे यांना आघाडी मिळाली आहे, तर बारामती गटात देविदास गावडे (अजित पवार गट) आणि जीबी गावडे (तावरे गट) यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. महिला गटात संगीता कोकरे (निळकंठेश्वर) आणि राजश्री कोकरे (सहकार बचाव) दोघीही आघाडीवर आहेत.

Spread the love