Eknath Shinde: जीवे मारण्याच्या धमकीनंतर मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

After the death threat, the Chief Minister reacted, saying…

मुंबई : सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना काल जीवे मारण्याची धमकी मिळाली. मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या धमकीनंतर मुख्यमंत्र्याच्या ठाण्यातील (Thane) आणि त्याचबरोबर शासकीय निवासस्थान ‘वर्षा’वरील सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. आता याबाबत एकनाथ शिंदेनी प्रतिक्रिया दिली आहे.

सणासुदीच्या मुहूर्तावर झेंडूची फुले महागणार; किलोचा भाव १००च्या आसपास जाण्याची शक्यता

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

याआधी देखील बऱ्याच वेळा असे प्रयत्न झाले आहेत, त्यामुळे मला काही अप्रुप नाही, असल्या धमक्यांचा माझ्यावर परिणाम होणार नाही अशा शब्दांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Rahul Gandhi: राहुल गांधींनी शरद पवार स्टाईलने मुसळधार पावसात दिल भाषण, व्हिडीओ व्हायरल

पुढे ते म्हणाले, “याआधी बऱ्याच वेळा नक्षल तसेच देश विघातक शक्तींनी प्रयत्न केला आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे नवीन नाही. त्यामुळे मला जनतेमध्ये जाण्यापासून असल्या धमक्या थांबवू शकत नाहीत. माझ्यावर धमक्यांचा परिणाम झालेला नाही आणि भविष्यात कधी होणारही नाही. पोलिस विभाग यंत्रणा याची काळजी घेतायेत”. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले

केंद्र सरकारने लॉन्च केले ‘जलदूत ऍप’, आता शेतकऱ्यांना मिळणार विहीरींच्या पाणी पातळीची माहिती

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *