कोंड्याची समस्या लिंबूने करा दूर, असं वापरा लिंबू

Remove dandruff problem with lemon, use lemon like this

मुंबई: हिवाळ्यात कोंड्याची समस्या (Dandruff problem) वाढते. जर तुम्हीही कोंड्याच्या समस्येने त्रस्त असाल तर लिंबाचा रस (Lemon juice) तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो. लिंबाच्या रसामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फेक्शन गुणधर्म कोंडा कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. याशिवाय केसांना होणारी खाज कमी करण्यासही ते मदत करू शकते. आज या लेखात आपण लिंबाच्या सेवनाने कोंड्याची समस्या कमी करण्याचे उपाय जाणून घेणार आहोत.

Diabetes: डायबिटीजसाठी ही भाजी आहे फायदेशीरमुंबई: , कोलेस्टेरॉल लेवलही होते कमी

कोंडा दूर करण्यासाठी लिंबू खोबरेल तेल (Coconut oil) आणि लिंबू कसे वापरावे

कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी लिंबू आणि खोबरेल तेल खूप प्रभावी ठरू शकता. ते वापरण्यासाठी एका भांड्यात 2 चमचे खोबरेल तेल घ्या. त्यात लिंबाचा रस मिसळा. आता कापसाच्या मदतीने ते तुमच्या टाळूवर लावा. यानंतर, सुमारे 1 तास असेच राहू द्या.त्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवा.याच्या मदतीने कोंड्याची समस्या दूर होऊ शकते.

Supriya Sule: “मुळात ही महाराष्ट्राची संस्कृती कधीही नव्हती”, RSS च्या बंदीवर सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

कोरफड वेरा जेल आणि लिंबू

डोक्यातील कोंडा कमी करण्यासाठी कोरफड वेरा जेल आणि लिंबाचा रस वापरा.ते वापरण्यासाठी 2 ते 3 चमचे कोरफडीचे जेल घ्या. त्यात लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर ते तुमच्या डोक्यात लावा.साधारण 15 मिनिटांनी केस धुवा.याच्या मदतीने कोंड्याची समस्या दूर होऊ शकते.

Lumpy: नागपुरात गौ विज्ञान अनुसंधान केंद्राने केला दावा, आता गोमूत्र आणि आयुर्वेदिक उपचारानं लम्पीवर होणार मात

ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाचा रस

कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाचा रस वापरा. यामुळे तुम्हाला थोड्या दिवसातच परिणाम मिळेल. ते वापरण्यासाठी, 1 चमचे ऑलिव्ह ऑइलमध्ये 1 चमचे लिंबाचा रस मिसळा.यानंतर ते डोक्यात लावा आणि काही काळ राहू द्या.यानंतर केस शॅम्पूने धुवा.यामुळे कोंड्याची समस्या दूर होईल.

Neeraj Chopra: गुजरातमध्ये चाहत्यांसोबत गरब्यावर थिरकताना दिसला गोल्डन बॉय नीरज चोप्रा; व्हिडिओ झाला प्रचंड व्हायरल

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *