
Politics News | सध्या लोकसभा निवडणुकांमुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या देखील राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला रवाना झाले आहेत. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Ajit pawar । “अजित पवार त्यांच्या कर्माने मरतील, पण…” बड्या नेत्याच्या वक्तव्याने मोठी खळबळ

माहितीनुसार, राज ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीत सहभागी होण्याबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे त्यांचे पुत्र आणि अजून महत्वाचे काही नेते राज ठाकरे यांच्यासोबत दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरेदिल्लीला रवाना झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.
Viral Video । ऋषिकेशमध्ये प्री-वेडिंग शूट करणं जोडप्याला पडलं महागात… घडलं भयानक, पाहा Video