
Pune Police । पुणे शहरामध्ये गुन्हेगारी सोबतच ड्रग्सची तस्करी देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. पुणे पोलिसांना पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसीमध्ये (Kurkumbh MIDC) ड्रग्सचा कारखाना मिळाला होता. कुरकुंभ या ठिकाणी एका केमिकल कारखान्यात ड्रग्स निर्मिती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.
Sharad Pawar । इंडिया आघाडीतील वादविवादावर शरद पवार यांनी केले सर्वात मोठे वक्तव्य
कुरकुंभ एमआयडीसीत ड्रग्स निर्मिती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले. त्यानंतर मिठाच्या पाकिटात भरून ड्रग्स तयार केले जात असल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून पोलीसही चक्रावले. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून त्या तिघांचेही आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी मुख्य आरोपी म्हणजेच कंपनीच्या मालकाचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. गेल्या चार दिवसापासून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत आतापर्यंत 4000 कोटी रुपये किमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत.