
मुंबई : करण जोहरचा चॅट शो कॉफी विथ करण मध्ये सेलिब्रिटींच्या खाजगी आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक किस्से उघडकीस येतात. त्यामुळे हा शो खूप चर्चेत असतो त्याचबरोबर चाहते सुद्धा या ‘शो’ला भरभरून प्रेम देतात .नुकतीच या शो मध्ये अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी हजेरी लावली आणि त्यांनी खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले.
Raju Srivastav Death: मोठी बातमी! कॉमेडीयन राजू श्रीवास्तवचे निधन
करण जोहरचा (Karan Johar) चॅट शो कॉफी विथ करण मध्ये “कोणत्या तीन गोष्टींमुळे तुम्ही अधिक तरुण दिसता?” असा प्रश्न करणने अनिल कपूर यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देत ते म्हणाले. “सेक्स, सेक्स, सेक्स.” असं म्हणत अनिल आपल्या एव्हरग्रीन लुकचे श्रेय सेक्सला देताना दिसून आले.
Gautami Patil: लावणीच्या नावावर गौतमी पाटीलने केले अश्लील चाळे, व्हिडिओ व्हायरल, टीकांचा पडला पाऊस
करणने याचा व्हिडीओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून (Instagram) शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.