
Viral News । ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडच्या 1770 किनाऱ्यावर गेल्या आठवड्यात एक दुःखद घटना घडली. स्नॉर्कलिंगचा आनंद घेत असलेल्या 20 वर्षीय विद्यार्थ्यावर अचानक शार्कने हल्ला केला. हा भयानक क्षण त्या मुलाच्या कॅमेऱ्यात कैद झाला, जो आता इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हा धक्कादायक चकमकी व्हिडीओ या मुलानेच शूट केला आहे.
कदाचित तो शार्कच्या हल्ल्यातून वाचू शकणार नाही असे त्याला वाटले. त्यामुळे आपल्या कुटुंबाची आठवण करून त्याने गुडबाय म्हटले आणि व्हिडिओ चित्रीकरणाला सुरुवात केली. Matteo Mariotti हा इटलीचा रहिवासी आहे. क्वीन्सलँडमध्ये तो सागरी जीवशास्त्राचा अभ्यास करत आहे. पण 8 डिसेंबरनंतर त्याचं सगळं जगच बदलून गेलं. शार्कच्या हल्ल्यात माटेओला त्याचे पाय गमवावे लागले.
Accident Video । ओव्हरटेक करताना भीषण अपघात, दुचाकीस्वार बसखाली आला; धक्कादायक व्हिडीओ समोर
त्या भयानक क्षणाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत मॅटिओने लिहिले की, ‘शार्कच्या पहिल्या हल्ल्यानंतर काही क्षणांनी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. मला वाटले हा राक्षस मला खाईल. यानंतर, माझ्या प्रियजनांची आठवण करून, मी निरोप घेतला आणि व्हिडिओ चित्रीकरण सुरू ठेवले. असे त्याने म्हंटले आहे.