
Beed News । सध्याचे शैक्षणिक धोरण हे बदलत चालले आहे. शिक्षण धोरण बदलत असले तरी अजूनही बरेच विद्यार्थी पेपरच्या वेळी कॉपी करतात. मात्र या विद्यार्थ्यांनी असं करू नये म्हणून बैठक व्यवस्था देखील कडक होत चालली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे देखील प्रत्येक शाळांमध्ये बसवण्यात येत आहेत. मात्र असं असलं तरी देखील कॉपी होण्याचे प्रकार हे घडतच आहेत.
Accident News । भीषण अपघात! लग्नाहून परतताना वऱ्हाडावर काळाचा घाला; सहा जणांचा जागीच मृत्यू
सध्या देखील बीड जिल्ह्यातील परळी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून कॉपीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीड जिल्ह्यातील परळी या ठिकाणच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात थेट मोबाईल समोर ठेवूनच कॉपी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
त्याचबरोबर पेपरला डमी विद्यार्थी बसविण्याचा देखील आरोप करण्यात येत आहे. परळी येथील नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयात हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थी करत असलेल्या कॉपी च्या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.