
Mumbai Airport । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांचे टेन्शन वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. (Mumbai Airport Terminal 2)
GPay आणि Paytm द्वारे मोबाईल रिचार्ज केल्यास इथून पुढे कंपनी घेणार जास्त पैसे; वाचा महत्वाची माहिती
गुरुवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर बॉम्बनं उडून देण्याची धमकी देणारा ई-मेल आला आहे. यामुळे एअरपोर्ट प्रशासनाची झोप उडाली आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीने हा स्फोट रोखण्यासाठी 48 तासांच्या आत एक दशलक्ष डॉलर्स भरण्याची मागणी देखील केली आहे.
धमकीच्या ई-मेल ची माहिती मिळताच तात्काळ मुंबई पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी लगेचच या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गुरुवारी सकाळी 11 वाजता मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या फीडबॅक इनबॉक्स मध्ये हा ई-मेल पाठवला होता. या ईमेलमध्ये आरोपीने लिहिले होते की, विमानतळाच्या टर्मिनल २ वर 48 तासांच्या आत बॉम्ब बॉम्बस्फोट करू जर आम्हाला बिटकॉइन मध्ये एक दशलक्ष डॉलर्स पाठवले तर हा बॉम्बस्फोट रोखला जाईल असे देखील म्हटल आहे.
Manoj Jarange Patil । भुजबळांना शांत करा, नाहीतर मराठा शांत करायला सक्षम – मनोज जरांगे पाटील
आता या प्रकरणाचा अधिकचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. मात्र ज्या आयपी ऍड्रेसचा वापर करून हा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला होता. त्याचा शोध घेण्यात आला आहे. त्यामुळे आता धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे पोलीस प्रयत्न करत आहेत.