शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसानचा 14 वा हप्ता आज होणार खात्यात जमा, मोदींच्या हस्ते वितरण होणार

Good news for farmers! The 14th installment of PM Kisan will be deposited in the account today, distributed by Modi

PM Kisan Yojna : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) चौदावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात वितरीत केला जाणार आहे. अनेक दिवसापासून शेतकरी या हप्त्याची वाट पाहत होते मात्र आता हा हप्ता आज जमा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Maharashtra Rain | पावसाचे थैमान सुरूच! अंगावर वीज कोसळून तिघांचा बळी

राजस्थानमधील (Rajasthan) सीकर या ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन समारंभाद्वारे PM किसानचा 14 वा हप्ता वितरीत केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती विस्तार व प्रशिक्षण कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सध्या पावसाचे दिवस चालू आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांना पैशांची देखील समस्या आहे. मात्र १४ वा हप्ता जमा झाल्याने शेतकऱ्यांना थोडा आर्थिक सहारा मिळणार आहे.

Sharad Pawar । ब्रेकिंग! केंद्रीय निवडणूक आयोगाची शरद पवार गटाला नोटीस

दरम्यान, PM किसान सन्मान निधी योजने अंतर्गत भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. हे सहा हजार रुपये प्रत्येकी चार महिन्याला दोन हजार रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांना पुन्हा मोठा धक्का! ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका महिलेचा शिंदे गटात प्रवेश

Spread the love