
Mumbai Pune Expressway । पुणे : राज्यात पावसाने (Rain in Maharashtra) दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी दरड कोसळत आहेत. दरम्यान, मागील चार ते पाच दिवसांपासून लोणावळ्यात (Heavy Rain in Lonavala) मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या तडाख्यामुळे लोणावळा (Lonavala), कुसगाव बु. आणि कार्ला परिसर जलमय झाला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले असून पुणे-मुंबई द्रुतगती (Mumbai Pune Expressway) मार्ग तसेच महामार्गावरील वाहतूकवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. (Latest Marathi News)
काल पावसामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर दोन ठिकाणी दरड (Landslide) कोसळली आहे. लोणावळाजवळ खंडाळा घाटात आणि आडोशी बोगद्याच्या जवळ दरड कोसळली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच आयआरबी, देवदूत यंत्रणा आणि महामार्ग पोलीस लगेचच घटनास्थळी धाव घेत दरड हटवायला सुरुवात केली. परंतु अजूनही मुंबईकडे जाणारी वाहतूक सेवा संथ गतीने सुरु आहे.
दरम्यान, लोणावळा धरण परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरण साठ्यात वाढ झाली आहे. जर पर्जन्याचा कल असाच सुरु राहिला तर धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून इंद्रायणी नदी पात्रात विसर्ग सूरू होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने नदी पात्रालगत आणि सखल भागातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
Ajit Pawar | “शरद पवारांनी मला राजकारण शिकवले नाही,” अजितदादांनी केला खळबळजनक गौप्यस्फोट