Tomato Price। टॉमॅटो महाग वाटत असतील तर खाऊ नका, भाजप मंत्र्याच्या अजब सल्ल्याने खळबळ

If tomatoes seem expensive, don't eat them, BJP minister's strange advice stirs excitement

Tomato Price। उशिरा का होईना पण राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकेकाळी कवडीमोल दरात विकल्या जाणारा टोमॅटो (Tomato) मागील काही दिवसांपासून 150 रुपयांच्यावर (Tomato Price) गेला आहे. टोमॅटोच्या किमतीत वाढ झाल्याने अनेकजण टोमॅटो खरेदी करत नाहीत. (Latest Marathi News)

ITBP Recruitment । दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, महिन्याला मिळणार 69 हजार पगार

टोमॅटोच्या वाढलेल्या किमतीवर सर्वसामान्य, सेलिब्रेटी तसेच राजकीय व्यक्ती प्रतिक्रिया देऊ लागले आहेत. यावर योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमधील मंत्री प्रतिभा शुक्ला (Pratibha Shukla) यांनी एक अजब वक्तव्य केले आहे. बोलताना त्या म्हणाल्या की, ” टोमॅटोच्या किमती वाढणे हे आपल्यासाठी काही नवीन नाही. सगळ्यात अगोदर जनतेला मी असे सांगेन की तुम्ही घरामध्ये कुंडीत टॉमॅटो लावा. जर या वस्तू महाग झाल्या असतील तर त्यांना खाऊ नका. त्यामुळे त्या वस्तू स्वस्त होतील”, असे वक्तव्य प्रतिभा शुक्ला यांनी केले आहे. (Tomato Price Hike)

Milk Price | राज्य सरकारची दूध दरवाढ खोटी! दरवाढ करूनही मिळतोय ‘इतकाच’ दर

त्यांच्या या वक्तव्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, त्यांचे हे वक्तव्य आता सोशल मीडियावर (Social media) चांगलेच व्हायरल होत आहे. त्यांना नेटकऱ्यांच्या सामोरे जावे लागत आहे. लोकप्रतिनिधी असताना अशी वक्तव्य कशी केली जातात असा संताप सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.

Bus Accident । धक्कादायक! बस तलावात पडून 17 जणांचा मृत्यू, तर 35 जखमी

हे ही पहा

Spread the love