
Delhi Crime । देशात दररोज गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी श्रद्धा वालकर (Shraddha Walker) हत्याकांडाने राजधानी दिल्ली (Delhi Crime) चांगलीच हादरली होती. असेच एक प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसला आहे. एका महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून उड्डाणपुलाजवळ फेकण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. (Latest Marathi News)
#WATCH | Delhi Police recovers the body of a woman, chopped into several pieces from near Geeta Colony flyover area. Police present at the spot.
— ANI (@ANI) July 12, 2023
More details are awaited. pic.twitter.com/F68RdUaifx
एएनआयच्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांना (Delhi Police) बुधवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास एका महिलेच्या शरिराचे तुकडे गीता कॉलनी फ्लायओव्हर भागात विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. पोलिसांना याची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तुकड्यांमध्ये मृतदेह पाहून पोलिसही चक्रावले असून सध्या या महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. या घटनेमुळे दिल्ली (Delhi) पुन्हा एकदा हादरली आहे.
हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये पुन्हा ढगफुटी! मुसळधार पावसामुळे 90 जणांचा मृत्यू
दरम्यान, यापूर्वीही दिल्लीमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यात श्रद्धा वालकर हत्याकांडात तिचा बॉयफ्रेन्ड अफताब पुनावाला याने श्रद्धाचा खून करून शरीराचे तुकडे जंगलात टाकून दिले होते. आता या प्रकरणामुळे पुन्हा या घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.