पाण्यात बुडालेल्या ‘त्या’ तरुणांना शोधण्यासाठी सोडले कॅमेरे, रेस्क्यू टीमला एक मृतदेह शोधण्यात यश

Rain

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहे. राज्यात पावसाने उशिरा जरी आगमन केले असले तर त्याने संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) व्यापून टाकला आहे. ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेकजण त्याचा आनंद घेताना दिसत आहेत. काल चिपळूणमध्ये (Chiplun) वशिष्ठी नदीत (Vashishti River) अंघोळीचा आनंद घेण्यासाठी 10 जण गेले होते. परंतु पावसाचा अंदाज न आल्याने दोघेजण पाण्यात वाहून गेले. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

टोमॅटोसाठी काय पण! भाजी विक्रेत्याने टोमॅटोच्या सुरक्षेसाठी ठेवले दोन बाऊन्सर, पहा व्हायरल व्हिडीओ

सदर घटनेची माहिती मिळताच तातडीने शिरगाव पोलीस 9Shirgaon Police) घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने मुलांचा शोध सुरु केला. परंतु त्यांना यश न आल्याने त्यांनी महाड येथील प्रशांत साळुंखे यांच्या रेस्क्यू टीमला (Rescue team) पाचारण केले. सध्या या दोन मुलांचा रेस्क्यू टीमकडून शोध सुरु आहे. त्यांनाही दोन मुलांचा तपास लागला नाही.

भीषण अपघात! पुण्यातील नवले पुलाजवळ कंटेनर उलटला

अखेर आज सकाळी रेस्क्यू टीमकडून पाण्यात कॅमेरे सोडले आहेत. त्यांना एका मुलाला ट्रेस करण्यात यश आले आहे. परंतु अजूनही दुसऱ्या मृतदेहाचा शोध सुरु आहे. ट्रेस केलेला मृतदेह खोल पाण्यात दगडाखाली अडकला असून तो बाहेर काढण्याचे प्रयत्न रेस्क्यू टीमकडून सुरु आहेत.

दोन उपमुख्यमंत्र्यानंतर आता दोन उपसरपंच? पठ्ठयाने केली एकनाथ शिंदेंकडे अजब मागणी

Spread the love