
Sharad Pawar । अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) फूट पडून दोन गट तयार झाले आहेत. तसेच अजित पवार यांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार गटाला शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटापेक्षा जास्त आमदारांचा आणि पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे. त्यावरून शरद पवार यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)
बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, “शरद पवार सैतान असून या सैतानाला त्याचे पाप फेडावे लागत आहे. त्यांच्यावर नियतीने मोठा सूड उगवला आहे. जैसी करनी, वैसी भरनी. त्यामुळे हा सैतान पुन्हा गावगाड्यात येऊन पुन्हा नवे सरदार बनवू नये, यासाठी आपल्याला लढाई लढावी लागणार आहे. आतापर्यंत काका मला वाचवा अशी हाक ऐकू यायची. परंतु आता पुतण्यापासून मला वाचवा, अशी नवी हाक राज्याला ऐकायला मिळत आहे, अशी टीका खोत (Sadabhau Khot Vs Sharad Pawar) यांनी केली आहे.
यापूर्वी सदाभाऊ खोत यांनी आयोजित शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अलिबाबा आणि चाळीस चोरांची टोळी आहे. त्यांनी शरद पवार यांचा उल्लेख शकुनीमामा म्हणून केली होती. आताही त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे त्यांच्या या टीकेला शरद पवार काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.
राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिली गुड न्यूज! पगारात होणार ‘इतकी’ वाढ