अधिकाऱ्याचा ९६ हजारांचा फोन तलावात पडला अन् त्याने चक्क केला २१ लाख लीटर पाण्याचा उपसा, नंतर करण्यात आली ‘ही’ मोठी कारवाई

Officer's 96,000 phone fell into the lake and he pumped 21 lakh liters of water, then 'this' major action was taken.

आपल्याकडे चांगला फोन असावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण फोन आकस्मितरित्या कुठे पडला तर तो परत, मिळवण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो? चक्क २१ लाख लिटर पाण्याचा उपसा फोन मिळवण्यासाठी केल्याची घटना छत्तीसगडमधील (Chhattisgarh) पंखापूरमध्ये घडली आहे. कांकेर जिल्ह्यातील पंखापूरमध्ये एका अन्नपुरवठा निरीक्षकाचा (Inspector of Food Supply) मोबाईल तलावात पडला होता. तो मोबाईल मिळवण्यासाठी या अधिकाऱ्याने सलग चार दिवस तलावातील पाण्याचा उपसा केला होता.

समृद्धी महामार्गाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा, म्हणाले…

पाणी उपसा करणाऱ्या या अधिकाऱ्याचे नाव राजेश विश्वास (Rajesh Vishwas) असे असून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपसा करण्यासाठी परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याला देखील नोटीस पाठवण्यात आलेली आहे. उपसा करण्यात आलेल्या पाण्याची रक्कम त्या अधिकाऱ्याच्या पगारातून वसूल करण्यात येणार आहे.

तीन डॉक्टरांनी मिळून तरुणासोबत केलं भयानक कृत्य, तरुणाने थेट जीवनच संपवलं; घटना वाचून बसेल धक्का

नेमकं काय आहे प्रकरण?

छत्तीसगडमधील पंखापूरयेथील एका अन्नपुरवठा निरीक्षकाचा २१ मे रोजी मोबाईल तलावाच्या पाण्यात पडला होता. राजेश त्याच्या मित्राबरोबर परालकोट (Paralkot) जलाशयाच्या परिसरात पार्टी करण्यासाठी गेला होता. त्यावेळेस त्याचा मोबाईल या तलावात पडला होता. या अधिकाऱ्याने त्याच्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी ३० एचपीच्या (HP) दोन मोटरच्या मदतीने सलग ४ दिवस २१ लाख लीटर पाण्याचा उपसा केला आहे. हे प्रकरण समजताच राजेशवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्याला तीन दिवसांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सलमान खान अडकणार लग्नबंधनात? भर गर्दीत महिलेने घातली लग्नाची मागणी, व्हिडिओही झाला व्हायरल

राजेशचं निलंबन उत्तर बस्तर कांकेरच्या जिल्हाधिकारी असणाऱ्या प्रियंका शुक्ला (Priyanka Shukla) यांनी केले आहे. राजेशला निलंबनाचा आदेश जारी करत शुक्ला म्हणाल्या आहेत की, “राजेश यांनी केवळ मोबाईल काढण्यासाठी २४ लाख लिटर पाण्याचा उपसा केला आहे. त्यांच्यावर पंखाजूर येथील एसडीएम यांच्या मार्फत चौकशी करण्यात आलेली आहे.

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

त्याचबरोबर हा पाणी उपसा करण्यासाठी जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी आरसी धिवार यांनी हा पाणी उपसा करण्यासाठी परवानगी दिली,असल्याची माहिती समोर आली आहे. आरसी धिवार यांनादेखील प्रियंका शुक्ला यांनी नोटीस पाठवली आहे.

हार्दिक पांड्यावर टीम इंडियाची जबाबदारी? आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना मिळणार संधी

धिवार यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये असे सांगण्यात आले आहे की, “राजेशने प्रसार माध्यमांमध्ये दिलेल्या निवेदनामध्ये आरसी धिवार यांच्याकडे तोंडी परवानगी मागितली आहे. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता धिवार यांनी राजेशला तोंडीचं परवानगी दिली होती. त्यांनी हे गैरवर्तन का केले? आणि या निर्णयाची कारणे दाखवा अशी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.“

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *