
आजकाल प्री-वेडिंगचा (Pre-wedding) ट्रेंड सुरू आहे. यामध्ये लोक लग्नाआधीच फोटोशूट करतात. नवविवाहित जोडप्यांनी एकमेकांना जास्त ओळखून घ्यावे या उद्देशाने हा ट्रेंड (Trend) सुरू झाला होता. दरम्यान सिरवी समाजाने (Siravi) हा ट्रेंड बंद करण्याचे ठरविले असून त्यांनी त्यांच्या समाजातील मुला-मुलींना प्री-वेडिंग करण्यासाठी मनाई केली आहे.
Emergency Call | इमर्जन्सी कॉल कसा कनेक्ट होतो माहिती आहे का ? जाणून घ्या अधिक…
लग्नामध्ये प्री-वेडिंग साठी होणारा अवाढव्य खर्च टाळण्यासाठी या सिरवी समाजाने प्री-वेडिंगसाठी बंदी घातली आहे. सिरवी समाज परगणा समितीने हा मोठा निर्णय घेतला आहे. प्री-वेडिंग शूटिंग भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, अवघ्या काही तासातच लागणार 12वीचा निकाल; ‘या’ ठिकाणी पाहा निकाल
सोनई मांझी या गावात सिरवी समाज परगणा समिती पाली यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये विवाह सोहळ्यामध्ये होणारा फालतू खर्च कमी करण्यासाठी बंदोलीतील डीजे आणि हळदी समारंभावर बंदी घातली. तसेच लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये वरांनी क्लीन शेव्ह करून यावे असा नवीन नियम तयार केला आहे.
Electric Bullet | रॉयल एनफिल्ड लाँच करणार इलेक्ट्रिक बुलेट ! कंपनीने गुंतवले एक हजार कोटी
याशिवाय लग्नाच्या आधी मुलगा आणि मुलगी यांना बाहेरगावी फिरायला पाठवले जाणार नाही. त्यामुळे लग्नाआधी वधू-वरांचे फोटोशूट आणि व्हिडिओ शूट करण्यावर पूर्ण बंदी असेल. तसेच लग्न पूर्ण होण्यापूर्वी, वधू आणि वराला कोठेही जाता येणार नाही. असे या बैठकीत ठरविण्यात आले आहे.