Eggs | अंडे शाकाहारी की मांसाहारी? शेवटी प्रश्नाचं उत्तर मिळालंच…

Egg vegetarian or non-vegetarian? Finally asked the question...

कोंबडी आधी की अंडे आधी? हा प्रश्न नेहमीच आपल्याला पडतो. या प्रश्नाचे उत्तर शोधताना भल्याभल्यांना पेच पडतो. त्याचप्रमाणे अंडे शाकाहारी (Veg) की मांसाहारी (Nonveg) हा सुद्धा पेचात पाडणारा प्रश्न आहे. अंड्यातून पिलू बाहेर येते त्यामुळे काही मंडळी अंड्याला मांसाहारात समाविष्ट करतात तर काही लोक गाईपासून मिळणारे दूध (Milk) शाकाहारी आहे, तर मग अंड्याने काय पाप केलं? असा युक्तिवाद करतात.

भर लग्न मंडपात नवरा-नवरीची एकमेकांना तुफान मारहाण, व्हिडिओही झाला व्हायरल; पाहा Video

मात्र वैज्ञानिकांनी आता या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. वैज्ञानिकांच्या सांगण्यानुसार, कोंबडी कोणत्याही कोंबड्याचा संपर्कात न येताही एक ते दीड दिवसाच्या कालावधीत अंडी देऊ शकते. त्यामुळे कोंबडयाच्या संपर्कात न येता कोंबडीने दिलेल्या अंड्यातून पिलू बाहेर येत नाही. या अंड्यांना ‘अनफर्टिलाइज्ड एग्स’ असे म्हणतात. ही अंडी शाकाहारी असतात, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

शेवटी डॉक्टरच तो! मृत्यूनंतरही तब्बल ११ जणांना दिले जीवनदान

एवढंच नाही तर बाजारात मिळणारी अंडी ही प्रामुख्याने शाकाहारीच असतात. ही अंडी poultry farm मधून आणली जातात त्यामुळे ती अंडी अनफर्टिलाइज्ड असतात. दरम्यान कोंबडीने कोंबडयाच्या संपर्कात येऊन अंडे दिले तर त्याला मांसाहारी समजले जाते. या अंड्यामध्ये गॅमीट सेल्स असल्याने त्यातून पिल्लू बाहेर येण्याची शक्यता असते.

मोठी दुर्घटाना! गंगा नदीत ४० लोकांनी भरलेली बोट उलटली; अनेकजण बेपत्ता

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *